Tuesday, November 4, 2008

मराठी विकिपीडियाला आपली मदत हवी आहे



नमस्कार,

तुम्हाला माहित असेलच की विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. हे लोकांनी लोकांसाठी तयार केलेले मुक्त ज्ञानाचे भांडार आहे.सर्व भाषांमध्ये ज्ञानकोश उपलब्ध व्हावा म्हणून जगातील अनेक भाषांमधील विकिपीडियाची सुरुवात झाली आहे. मराठी विकिपीडिया हा याच प्रकल्पाचा एक भाग आहे. मराठी विकिपीडिया सध्या अर्भक अवस्थेत आहे. सद्ध्या यामध्ये सुमारे २०,६४७ लेख आहेत. या तुलनेत इंग्रजी विकिपीडिया मध्ये सुमारे २५,६०,००० लेख आहेत. अनेक शाळेत जाणारी मुले तसेच इंग्रजी न जाणणार्‍या व्यक्ती भाषेच्या कारणामुळे या ज्ञानापासून वंचित राहत आहेत. तसेच याचा उपयोग अभ्यासकांनासुद्धा होतो. याचसाठी मराठी विकिपीडियाला आपली मदत हवी आहे.

मला माहिती आहे तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील...जसे...

१. मराठीत typing करणे खूप अवघड असते....मला जमेल का?
मराठीत typing करणे आधी खूप अवघड होते. पण आता unicode मुळे हे एकदम सोपे झाले आहे. बराहा नावाचे software हे काम एकदम सोपे करते. उदा. आपण chatting करतांना जसे 'kasa aahes?' लिहितो, तेच बराहा install केल्यावर 'कसा आहेस?' असे बनते. आणि सर्व browsers unicode support करतात. बराहा शिवाय पण अनेक सोपे पर्याय उपलब्ध आहेत.

आतातर बराहा किंवा इतर software वापरायची पण गरज नाही. Javascript च्या मदतीने आपण मराठीमध्ये लेखन करू शकता. याबाबतीत अधिक माहिती पुढील अनुदिनीमध्ये देईल. तोपर्यंत तुम्ही इथे बघु शकता.

२. मराठी व्याकरण...बाप रे...
व्याकरणात चुका सुरुवातीला होतील. पण अनेक विकिपीडियन मंडळी नवीन झालेले बदल बघत असतात. ते त्या चुका दूर करतील. हळुहळू तुमच्या चुकापण कमी होत जातील.


३ . विकिपीडिया मध्ये लिहायचे म्हणजे General Knowledge एकदम जबरदस्त हवा, त्या विषयाची पूर्ण माहिती हवी...मला ते जमेल का?
विकिपीडियामध्ये एकच माणूस पूर्ण लेख लिहित नाही, तर तो लेख सर्वांच्या मदतीने थोडा थोडा करत बनत जातो. लेखाचा अपूर्ण भाग बघून आणि त्याबद्दल माहिती गोळा करून तुम्ही तिथे भरू शकता.

ते पण अवघड वाटत असेल तर एक इंग्रजी विकिपीडियामधील लेख घ्या आणि त्याचे भाषांतर करायला चालू करा.

ते पण अवघड वाटत असेल तर तुम्हाला जो लेख विकिपीडियामध्ये असावा असे वाटते त्या लेखाचे पान तयार करून इतर विकिपीडियन मंडळींना त्या लेखाच्या विस्तारासाठी विनंती करा.

तसेच लेखांची विविध वर्गांमध्ये विभागणी करा. तसेच इतरांच्या बदलांचे वाचन करा आणि त्यात काही चूक असेल तर त्या सांगा/बदला.

४. पण विकिपीडियावर लिखाण कसे करायचे?
विकिपीडियावर नवीन मंडळींसाठी अनेक मदत पाने आहेत. 'मराठी typing',लेख लिहिणे etc, सर्व बाबतीत तिथे मदत मिळेल. आणि अजून काही असले तर इतर मंडळींना चावडीवर विचारा.

ती रामायणातील खार आठवते ना...आपण पण खारीचा वाटा दिला तर हा विकिपीडियाचा प्रकल्प खूप वाढीस लागू शकतो...

तुम्ही तुमची एखादी खूण तुमच्या मदतीद्वारे ज्ञानकोशामध्ये अमर करू शकता.

विकिपीडियामध्ये नोंदणी करा...आणि हातभार लावा.

आपला,
क्षितिज पाडळकर.
(एकदम नवीन विकिपीडियन....अगदी तुमच्यासारखा)

3 comments:

Veerendra said...

वा छानच लिहिलास लेख .. एकदम मस्त्त !

bumblebee... said...

मराठी विकिला आपलं समजुन - एक सामाजिक जाणीव म्हणा हवं तर - आपल्या थोड्याशा वेळाची अन् माहितीची गरज आहे ...! तुम्हाला सांगतो, त्या मध्ये एक वेगळाच आनंद ही आहे... शिवाय चांगल्या कामाची पावती म्हणजे विकि कडुन मिळणारे ते पदक.... जणु गड जिंकल्याचा आनंद ... मी ही काही वर्षापुर्वी विकिसाठी नवाच होतो ... पण आता जसा वेळ मिळतो तसा लिहितो..

आणि हो.. तुम्ही गमभन ही वेबसाइट पहिलय का? मराठी आणि इतर भारतीय भाषा लिहिण्यासाठी - अगदी तुमच्या ब्राउजरमध्येच सोय उपल्ब्ध आहे... !

http://www.gamabhana.com/gamabhana_ex/

Kshitij said...

धन्यवाद वीरेंद्र व bumblebee..
चला विकिपीडियाला अजून पुढे नेऊ या..