हा अनुदिनी-प्रपंच Raj यांच्या एक नवे स्फूर्तिस्थान या अनुदिनीवरील माझे विचार मांडतो
आपले मत मला काही अंशी पटले, सद्ध्याचा काळात राजकीय स्फूर्तिस्थाने कमीच आहेत...पण त्यामुळे ओबामाला स्फूर्तिस्थान मानावे हे काही योग्य नाही.
माझ्या मते अनेक राजकारण्यांप्रमाणे त्याचेही पाय तितकेच मातीचे (वा चिखलाचे) आहेत. माझ्या मते कष्णवर्णीय राष्ट्रपती निवडून येणे हे दर्शविते की आता अमेरिकेतील नागरिकांच्या मनातील पूर्वापार चालत आलेली white-black ची दरी कमी झाली आहे व त्यांनी ओबामाला मते तो काळा आहे का गोरा आहे यावरून न देता तो मॅकेनपेक्षा बरा आहे म्हणून दिली. ओबामाची योग्यता त्याच्या पूढील कामकाजावरून सिद्ध होईल.
माझेच म्हणणे बरोबर आहे असा माझा आग्रह नाही, पण "जेव्हा आपण कष्णवर्णीय राष्ट्रपती झाला, म्हणून ओबामाचे कौतुक करतो - तेव्हा आपण एकप्रकारे "कष्णवर्णीय/गौरवर्णीय" हा भेद मनातल्या मनात स्विकारतो."
ओबामाचे वक्तृत्वकौशल्य मात्र वाखाणण्याजोगे आहे. वाक्यफेकीची त्याची शैली दाद घेऊन जाते. विशेषतः कालचे भाषण उत्कृष्ठ होते.
आणि राहिली गोष्ट स्फूर्तिस्थानांची - ती आपण इतर क्षेत्रातपण हुडकू शकतो, खगोलशास्त्रामध्ये नारळीकर आहेत, संगणकशास्त्रामध्ये नरेंद्र करमरकर आहेत, संगीतशास्त्रामध्ये भीमसेन जोशी आहेत, किंवा रोजच्या दिनचर्येत आपल्या घरचा रोज येणारा पोस्टमन आहे(हा प्रत्येकाला लाभेलच की नाही सांगता येणार नाही :) ) ... येथे मी फक्त मराठी व्यक्तींची यादी केली आहे ... भारतीय व आंतरराष्ट्रीय व्यक्ती टाकल्यास ती exponentially वाढेल.
"Hope is a good thing, Andy. Maybe the best of things."
हे मात्र शंभर टक्के सत्य आहे And I hope good things will happen.
क.लो.अ.
क्षितिज पाडळकर
